Ad will apear here
Next
... आणि गुगलवर झळकलं ‘पुलं’चं डूडल!


पु. ल. देशपांडे... सकल मराठी जनांच्या मनांवर अधिराज्य गाजवणारं नाव... आज, अर्थात आठ नोव्हेंबर २०२० रोजी ‘पुलं’ची १०१वी जयंती आहे. त्या निमित्ताने गुगलने ‘पुलं’वर डूडल करून महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्त्वाला आदरांजली वाहिली आहे. मुंबईतले चित्रकार समीर कुलावूर यांनी हे डूडल साकारलं आहे. गुगलचं हे डूडल भारतात सर्वत्र दिसणार आहे.

गुगल डूडलच्या वेबसाइटवर ‘पुलं’चं संक्षिप्त चरित्र आणि चित्रकार समीर कुलावूर यांच्या हे डूडल तयार करण्यामागच्या भावना आणि विचार देण्यात आले आहेत. ‘मुंबई-महाराष्ट्रात जन्मलो आणि वाढलो असल्याने साहित्य, गीत-संगीत, नाटक अशा विविध क्षेत्रांत लोकप्रिय व्यक्ती म्हणून पुलंचं नाव आपल्यासमोर येतच राहतं. जीवनाकडे बारकाईने पाहण्याची दृष्टी हे त्यांचं वैशिष्ट्य त्यांच्या लेखनातूनही स्पष्ट दिसतं. ‘नाच रे मोरा’ हे त्यांचं गाणं खूप लोकप्रिय आहे आणि शाळेत असताना त्याची गोडी आम्हाला लागली होती. आश्चर्य म्हणजे त्या गाण्याला ‘पुलं’नी संगीत दिलं आहे हे मला फार उशिरा कळलं,’ असं कुलावूर यांनी म्हटलं आहे.

‘पुलं हे बहुआयामी, बहुपैलू आणि उत्तुंग असं व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे या विषयावर काम करायला मिळणं हा सन्मानच आहे. या डूडलसाठी ‘नाच रे मोरा’ या गाण्यातून थोडी प्रेरणा घेतली आहे आणि त्यांचं सप्तरंगी व्यक्तिमत्त्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘पुलं’चं जीवन आणि त्यांचं कार्य हाच एक मोठा संदेश आहे. एकच व्यक्ती सर्जनाचे विविध आविष्कार कसे करू शकते, हे मला या डूडलमधून विशेषत्वानं दाखवायचं आहे,’ असं कुलावूर यांनी सांगितलं. 

(अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OWCGCS
Similar Posts
पु. ल. देशपांडे जगभर पसरलेल्या मराठी माणसांनी खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर मनापासून अतोनात प्रेम केलं, अशा महाराष्ट्राच्या खऱ्याखुऱ्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा म्हणजेच ‘पुलं’चा आठ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
‘पुलं’विषयी वेगळी आपुलकी’ ‘मी वाचतो भरपूर; पण सर्व लेखकांच्या तुलनेत ‘पुलं’विषयी एक वेगळी आपुलकी आहे, जवळीक आहे....’ हे विचार आहेत आजच्या पिढीतला अभ्यासू अभिनेता आणि ‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटकात साक्षात ‘पुलं’चीच भूमिका साकारण्याचं भाग्य लाभलेला रंगकर्मी आनंद इंगळे याचे. ‘पुलं’च्या जयंतीनिमित्त आनंदनं त्यांच्याबद्दलच्या भावना ‘बाइट्स ऑफ इंडिया’कडे व्यक्त केल्या
‘पुलं’ म्हणजे मराठीतले टागोर’ ‘रवींद्रनाथांनी बंगाली साहित्यात जसा सर्वत्र संचार केला, तसा मराठीत ‘पुलं’नी केला आहे. मराठीत ते जवळजवळ गुरुदेवांच्या पदावर पोहचले आहेत, असं ‘गदिमां’नी म्हटलं आहे. ‘पुलं’च्या कामगिरीचा याहून वेगळा काही सारांश सांगता येत नाही,’ अशी भावना पु. ल. देशपांडे यांचे द्विखंडीय समग्र चरित्र लिहिणाऱ्या ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केली
साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर २६ ते २८ मार्च २०२१ या कालावधीत नाशिक येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. कुशाग्र बुद्धिमत्तेचे संशोधक आणि विज्ञानासारख्या प्रामुख्याने इंग्रजीवरच आधारित असलेल्या क्षेत्रात कार्यरत असूनही शुद्ध आणि साध्या-सोप्या मराठी भाषेत साहित्यनिर्मिती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language